Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

27 Sep 2026

3 linked posts
अंबरनाथ वर्षा मॅरेथॉन Photos

ग्रीन सिटी, अंबरनाथ येथे Deccan Athletic Foundation (DAF) प्रस्तुत अंबरनाथ वर्षा मॅरेथॉन २०२६ च्या बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहून विजेत्यांचा गौरव करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह मेडल्स व बक्षीसे देऊन अभिनंदन करण्यात आले.

आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. “Run for Health, Run for Earth” या संकल्पनेतून आरोग्य आणि पर्यावरण यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला.

यावेळी गटनेता तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजित गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेवक श्री. मनेष गुंजाळ उपस्थित होते. या शानदार आयोजनासाठी Deccan Athletic Foundation (DAF) तसेच सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक पर्यटन दिवस Graphic

जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

पर्यटन म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नाही, तर नवीन संस्कृती समजून घेणे, इतिहास अनुभवणे, निसर्गाचा आनंद घेणे आणि विविधतेतून शिकण्याची एक सुंदर संधी आहे.

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.

आपल्या देशातील पर्यटनस्थळांना भेट देताना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्याची जबाबदारीही आपलीच आहे. चला, ह्या पर्यटनदिनी आपल्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प करूया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आंतरराष्ट्रीय कन्या दिन Graphic

आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कन्या म्हणजे घरातील लक्ष्मी, घराचा आनंद, प्रेम आणि मायेची सुंदर ओळख असते. तिच्या निरागस हास्यात घराचे सुख सामावलेले असते.

प्रत्येक मुलगी ही तिच्या कुटुंबाची आणि समाजाची अमूल्य ताकद आहे. मुलगी शिकली, सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज पुढे जातो.

तिच्या स्वप्नांना बळ देऊया, तिच्या प्रत्येक यशाचा अभिमान बाळगूया आणि तिला समान संधी, सुरक्षित वातावरण आणि भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश देऊया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद