अंबरनाथ नगरपरिषदेत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, स्नेहपूर्ण संवाद आणि आपुलकीचे सुंदर क्षण अनुभवायला मिळाले. आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करत महिलांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी नगरसेविका तथा शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सौ. किमया पवार, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, नगरसेविका सौ. संगीता गायकर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर व सौ. संगीता मोरे उपस्थित होत्या. महिलांच्या स्नेह, एकजूट आणि उत्साहाने हा हळदी-कुंकू सोहळा अधिकच खास ठरला.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷