अंबरनाथ शहरातील विविध गणेशभक्तांच्या घरी तसेच शिवस्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडळ व गणेश नगर, खुंटवली येथे अंबरनाथ विधानसभा सहसंयोजक श्री. अनिल गायकवाड यांच्या निवासस्थानीही बाप्पाचे दर्शन घेऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी नगरसेविका सौ. मिना वाळेकर, स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्री. पवन वाळेकर, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ-२ उपाध्यक्ष श्री. अंब्रेश गौडा, महिला मोर्चा मंडळ-२ सरचिटणीस सौ. ज्योती भंडारे तसेच सौ. शीतल पवार उपस्थित होते.
गणरायाच्या भक्तिमय वातावरणात भक्तांशी संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷