Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

22 Sep 2026

1 linked post
गणपती बाप्पा दर्शन Photos

अंबरनाथ शहरातील नगरसेवक श्री. सुनील वाघे, शिवसेना उपशहरप्रमुख (अंबरनाथ शहर) श्री. पुरुषोत्तम उगले तसेच नगरसेविका सौ. वीणा पुरुषोत्तम उगले यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले.

तसेच अंबरनाथ शहरातील विविध भागांमध्ये गणेश भक्तांच्या घरी भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा आनंद मिळाला.

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा.

गणपती बाप्पा मोरया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद