अंबरनाथ शहरातील विविध ठिकाणी गणरायाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने गणेशभक्तांच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली.
स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्री. पवन वाळेकर व नगरसेविका सौ. मिना वाळेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक श्री. विपुल पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. रुपाली लठ्ठे तसेच भाजपा कार्यकर्त्या कृष्णबा शिसोदिया उपस्थित होत्या.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷