अंबरनाथ शहरातील विविध भागांमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
या मंगलमय प्रसंगी भक्तांशी संवाद साधत त्यांच्या प्रेमळ आतिथ्याचा स्वीकार केला. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत प्रत्येक कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-शांती नांदो आणि अंबरनाथ शहराची अशीच सर्वांगीण प्रगती होत राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷