Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

17 Sep 2026

6 linked posts
नरेंद्र मोदीजी वाढदिवस शुभेच्छा Reel

गुजरातच्या वडनगरपासून सुरू झालेल्या या प्रवासात संघर्ष होता, कष्ट होते, अनेक आव्हाने होती पण त्यासोबत होती देशासाठी काहीतरी करण्याची ध्येयवेडी जिद्द.

कुटुंबाची साधी पार्श्वभूमी, बालपणातील अनुभव, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी..

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या प्रवासाकडे पुन्हा एकदा पाहताना, एका सामान्य पार्श्वभूमीतून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरते. मा. श्री. नरेंद्र मोदीजींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गणपती दर्शन Photos

अंबरनाथ शहरातील विविध भागांमध्ये गणेशभक्तांच्या घरी जाऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांशी संवाद साधत बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना केली.

यावेळी उत्तर भारतीय शहर अध्यक्ष, अंबरनाथ श्री. प्रमोद कुमार चौबे, नगरसेविका तथा उपसभापती सौ. किरण चौबे आणि सौ. जयश्री मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. तसेच शिव धाम कॉम्प्लेक्स येथे श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेवक श्री. निखिल चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील व श्री. विश्वास निंबाळकर यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी गणरायाचे दर्शन घेतले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गणपती दर्शन Photos

गणरायाच्या मंगलमय आगमनाने अंबरनाथ शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी प्रत्येक ठिकाणी दिसणारा भक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे. या भक्तिमय वातावरणात शहरातील विविध ठिकाणी गणेशभक्तांच्या घरी जाऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

गणरायाच्या चरणी नतमस्तक होत अंबरनाथ शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी नांदो

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भगवान विश्वकर्मा जयंती Graphic

सृष्टीच्या रचनेपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीपर्यंत, कौशल्य, कष्ट आणि सर्जनशीलतेचे प्रतीक म्हणजे भगवान विश्वकर्मा.

देवांचे वास्तुकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांनी वास्तुकला, शिल्पकला आणि अभियांत्रिकीच्या परंपरेला प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

ज्येष्ठा गौरी आवाहन Graphic

महालक्ष्मीस्वरूप ज्येष्ठा गौरींच्या आगमनाने घराघरांत भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पवित्र पर्वाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात समाधान, समृद्धी आणि मंगलमय क्षणांची अखंड बरसात होत राहो, हीच सदिच्छा. ज्येष्ठा गौरी आगमनाच्या सर्व अंबरनाथकरांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नरेंद्र मोदीजी वाढदिवस Graphic

देशाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी अविरत प्रयत्नशील असलेले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला आणि राष्ट्रसेवेच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे नेतृत्व देशाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद