अंबरनाथ येथे नगरसेवक श्री. उमेश पाटील व नगरसेविका सौ. दर्शना पाटील यांच्या निवासस्थानी तसेच अंबरनाथ शहरातील अनेक गणेशभक्तांच्या घरी भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सुरेंद्र पाटील आणि उद्योजक श्री. दिपक सुरोशे यांच्या समवेत गणरायाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वात प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो, यासाठी श्री गणरायाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना केली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷