अंबरनाथ शहरातील विविध ठिकाणी जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नगरसेविका सौ. शामला माणचेकर व समाजसेवक श्री. सचिन मानेचकर, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ तसेच नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर व समाजसेवक श्री. अजय मोहोरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेण्यात आले.
यावेळी अंबरनाथ शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत श्री गणेशाचे दर्शन घेण्यात आले.
गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र निर्माण झालेला भक्तिमय उत्साह अनुभवून मन प्रसन्न झाले. श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷