अंबरनाथ नगरपरिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ २०२६ आयोजित गणेशोत्सवानिमित्त अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात श्री गणेश मूर्तीची विधिवत स्थापना व पूजन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत श्री गणरायाची पूजा करण्याचा योग आला. त्यांच्या सहवासात हा भक्तिमय क्षण अनुभवता आला.
श्री गणरायाच्या आगमनाने संपूर्ण नगरपरिषद कार्यालय परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो! हीच विघ्नहर्ता गणराया चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷