Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

10 Sep 2026

2 linked posts
भाजपा कार्यकारिणी बैठक Photos

भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या कार्यकारणी बैठकीस उपस्थित राहण्याचा योग आला. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी काळातील विविध उपक्रम, पक्षाची भूमिका आणि जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत संघटन बळकटीकरण, नागरिकांच्या समस्या, विकासकामे आणि पक्षाची पुढील वाटचाल यावर विचारमंथन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री श्री. जगन्नाथ पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष श्री. नंदकिशोर परब, माजी जिल्हाध्यक्ष, कल्याण भाजपा श्री. नाना सूर्यवंशी, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती, KDMC श्री. दिपेश म्हात्रे, सभागृह नेते तथा नगरसेवक, KDMC श्री. वरुण पाटील, १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ आमदार सौ. सुलभाताई गायकवाड, माजी आमदार कल्याण ग्रामीण मतदारसंघ श्री. सुभाष भोईर, कल्याण जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.

रवी ठाकूर, महिला मोर्चा, कल्याण जिल्हाध्यक्ष सौ अर्चना सूर्यवंशी, गटनेते तथा नगरसेवक, भाजपा (KDMC) श्री. शशिकांत कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती अतिश पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे व अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवत, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा आणि विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प यावेळी अधिक दृढ झाला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पोळा सण Graphic

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बळीराजाच्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस!

शेतकऱ्यांच्या कष्टाला, मातीतल्या नात्याला आणि बैलांच्या योगदानाला मनापासून नमन.. सर्व शेतकरी बांधवांना पोळा निमित्त मंगलमय शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद