आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांच्या समस्या व सूचना जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
विविध भागातील नागरिक आपल्या समस्या, सूचना व अडचणी घेऊन कार्यालयात आले होते. यावेळी नागरिकांचे म्हणणे जाणून घेत संबंधित समस्यांवर आवश्यक कार्यवाही करून उपाययोजना करण्यात येईल असे आश्वस्त केले.
तसेच काही नागरिकांनी सदिच्छा भेट घेतली. नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷