Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

08 Sep 2026

3 linked posts
समाज मंदिर उद्घाटन Photos

अंबरनाथ पश्चिम येथील मोरिवली गावात तेली समाजाच्या समाज मंदिराचे उद्घाटन पार पडले. या समाज मंदिराला भेट देऊन समाज बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील देखील उपस्थित होते. समाज मंदिर हे एकता, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र ठरो, हीच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद बैठक Photos

अंबरनाथ शहरातील तृतीयपंथी समाजासाठी सेंट्रल होम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीस माजी नगरसेवक व पत्रकार श्री. पंकज पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच समाजसेविका छकुलीताई बनसोडे यांच्यासह तृतीयपंथी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींनी सुरक्षित निवारा, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, रोजगार प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी सेंट्रल होम उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी मांडली.

या मागणीवर सकारात्मक चर्चा करत, अंबरनाथमध्ये तृतीयपंथी समाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जागतिक साक्षरता दिन Graphic

साक्षर समाज म्हणजे सशक्त समाज..!

जागतिक साक्षरता दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून, सक्षम आणि स्वावलंबी समाज घडवण्याची ताकद आहे. चला, शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि सशक्त समाज घडवूया!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद