Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

07 Sep 2026

5 linked posts
Holy school teacher's day Reel

होली फेथ इंग्लिश स्कूल, अंबरनाथ येथे शिक्षक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या स्वप्नांना, मेहनतीला आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संवाद साधला.

याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल सौ. अनिता केंगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि शिक्षकांच्या समर्पणाने भारावून टाकणारा हा शिक्षक दिनाचा विशेष क्षण ठरला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय बैठक Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर बैठक पार पडली.

या बैठकीस पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी तसेच नगरपरिषदेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आवश्यक मैदानाची उपलब्धता, सुविधा आणि पुढील नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेवक श्री. विकास सोमेश्वर, शहरप्रमुख - युवासेना अंबरनाथ पूर्व श्री. राहुल सोमेश्वर यांच्यासह पोलीस भरतीचे विद्यार्थीही उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Rotary Club of badlapur, nation builder award ceremony Photos

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आयोजित “Nation Builder Award Ceremony 2026” या सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.

समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या Nation Builders चा सन्मान करणारा हा प्रेरणादायी सोहळा निश्चितच कौतुकास्पद होता. सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! यावेळी कुळगाव बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. रुचिताताई घोरपडे तसेच आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगरसेविका सौ. हर्षदा पवार अभिष्टचिंतन सोहळा

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. हर्षदा उमेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा तसेच नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जनसेवा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे कार्य असेच निरंतर सुरू राहावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जय संताजी सेवा मंडळ, वार्षिक सर्वसाधारण सभा Photos

सोमेश्वर हॉल येथे जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा निवडणूक अध्यक्ष श्री. नाना सुर्यवंशी, मंडळाचे अध्यक्ष श्री. भरत चौधरी, श्री. हर्षल काटके तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून पुढील कार्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद