Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

06 Sep 2026

2 linked posts
दहीहंडी उत्सव, अंबरनाथ Reel

अंबरनाथ शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवांना उपस्थित राहून गोविंदा पथकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवसेना संलग्न श्री हनुमान मित्र मंडळ व शिव मित्र मंडळ, मेठल नगर आयोजित भव्य दहीकाला उत्सव, गटनेते व नगरसेवक श्री. रवींद्र करंजुले व माजी नगरसेविका सौ. रेखा रवींद्र करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

तसेच उत्तर भारतीय शहर अध्यक्ष अंबरनाथ श्री. प्रमोद चौबे व महिला व बालकल्याण समिती उपसभापती व नगरसेविका सौ. किरण चौबे यांच्या आयोजनातून झालेल्या सार्वजनिक दहीहंडी महोत्सवात उपस्थित राहण्यात आले.

बाबू पाटील प्रतिष्ठान, पालेगाव, अंबरनाथ यांच्या वतीने युवा मोर्चा सरचिटणीस श्री. हरेश देसाई पाटील व समाजसेविका सौ. दीप्ती म्हस्के देसाई यांच्या आयोजनातून झालेल्या भव्य दहीहंडी उत्सवातही सहभागी होण्याचा योग आला.

तसेच हुतात्मा चौक, अंबरनाथ पूर्व येथे उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती श्री. सदाशिव पाटील, नगरसेवक श्री. सचिन पाटील, समाजसेविका सौ. आशा पाटील, नगरसेविका सौ. अश्विनी पाटील, पाणीपुरवठा सभापती सौ. सुनीता पाटील व नगरसेविका सौ. पूनम शेलार यांच्या आयोजनातून झालेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्यात आले.

दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर एकता, साहस, संघभावना आणि आपल्या समृद्ध परंपरेचा उत्सव आहे. अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गोविंदा पथकांचा जोश पाहून मन आनंदाने भरून आले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नमो दहीहंडी उत्सव Reel

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर आयोजित ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’ हा भव्य दहीहंडी उत्सव अंबरनाथकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला.

महिला गोविंदा पथकांसह विविध गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत उत्सवाची रंगत अधिक वाढवली. नारीशक्तीचा जोश, गोविंदांचा थरार आणि अंबरनाथकरांनी दिलेला भरभरून प्रतिसाद यामुळे हा उत्सव अविस्मरणीय ठरला.

तसेच आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धा व रील स्पर्धेलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्साह वाढवल्याबद्दल सर्व अंबरनाथकरांचे मनःपूर्वक आभार.

याप्रसंगी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेवक श्री. विपुल पाटील, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, अंबरनाथ पूर्व विस्तारक श्री. पांडुरंग भोसले, अंबरनाथ पश्चिम विस्तारक श्री. वसंत सुतार, अंबरनाथ पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री. प्रकाश वाळुंज, अंबरनाथ पूर्व उपाध्यक्ष श्री. दत्ता देशमुख, अंबरनाथ शहर पश्चिम उपाध्यक्ष श्री. अंब्रेश गौडा, शहर उपाध्यक्ष अंबरनाथ पूर्व श्री. राजेश पांडे, अंबरनाथ विधानसभा सहसंयोजक श्री. अनिल दादा गायकवाड, अंबरनाथ पूर्व सचिव सौ. रीना मोरे, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे, भाजपा महिला उपाध्यक्ष अंबरनाथ पश्चिम सौ. पूजा रणदिवे, समाजसेवक श्री. बबलू सिंग, श्री. सुरेश वाळेकर, भाजपा कार्यकर्ता श्री. कृष्णबा शिसोदिया आणि सौ. शीतल पवार यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद