Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

05 Sep 2026

6 linked posts
बदलापूर दहीहंडी उत्सव Photos

चिंतामणी फाउंडेशन आणि निमेश दादा जनवाड आयोजित बदलापूरची सर्वात मोठी दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून गोविंदा पथकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून एकता, साहस, संघभावना आणि परंपरेचा उत्सव आहे. हीच सकारात्मक ऊर्जा आणि एकजूट बदलापूरच्या प्रगतीसाठी कायम प्रेरणादायी ठरावी, हीच सदिच्छा.

यावेळी नगरसेवक श्री. प्रफुल मोरे, समाजसेवक श्री. निमेश जनवाड, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नारायणी event भेट Photos

बदलापूरकरांच्या आवडीचं Narayani Events आयोजित गणपती विशेष भव्य खरेदी आणि विक्री प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचा योग आला.

प्रदर्शनातील सुंदर कलेक्शन, आकर्षक वस्तू आणि उत्तम मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा आनंद आणि विविध वस्तूंची सुंदर मेजवानी अनुभवायला मिळाली. आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नमो दहीहंडी उत्सव Photos

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर आयोजित ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’ या उत्साहपूर्ण दहीहंडी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

महिला गोविंदा पथकांसह विविध गोविंदा पथकांनी दमदार सहभाग नोंदवत दहीहंडीचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी नारीशक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. तसेच वेशभूषा स्पर्धा आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व अंबरनाथकरांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेवक श्री. विपुल पाटील, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, अंबरनाथ पूर्व विस्तारक श्री. पांडुरंग भोसले, अंबरनाथ पश्चिम विस्तारक श्री. वसंत सुतार, अंबरनाथ पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री. प्रकाश वाळुंज, अंबरनाथ पूर्व उपाध्यक्ष श्री. दत्ता देशमुख, अंबरनाथ शहर पश्चिम उपाध्यक्ष श्री. अंब्रेश गौडा, शहर उपाध्यक्ष अंबरनाथ पूर्व श्री. राजेश पांडे, अंबरनाथ विधानसभा सहसंयोजक श्री. अनिल दादा गायकवाड, अंबरनाथ पूर्व सचिव सौ. रीना मोरे, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे, भाजपा महिला उपाध्यक्ष अंबरनाथ पश्चिम सौ. पूजा रणदिवे, समाजसेवक श्री. बबलू सिंग, श्री. सुरेश वाळेकर, भाजपा कार्यकर्ता श्री. कृष्णबा शिसोदिया आणि सौ. शीतल पवार यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जन्माष्टमी कार्यक्रम Photos

श्री पशुपतिनाथ उत्सव समिती, शंकर हाइट्स, अंबरनाथ पश्चिम आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन आशीर्वाद घेतले. यावेळी नगरसेवक श्री. उमेश पाटील देखील उपस्थित होते.

भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. धर्माचे रक्षण आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा श्रीकृष्णांच्या विचारांतून सदैव मिळत राहो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

शिक्षक दिन Graphic

भारताचे दुसरे राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

“परिवर्तनाचे माध्यम म्हणजे शिक्षक, विकासाचा मंत्र म्हणजे शिक्षक!”

ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिकवण देत समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

दहीहंडी उत्सव व गोपाळकाला Graphic

श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा, एकजुटीचा आणि उत्साहाचा संदेश देणारा दहीहंडी उत्सव आणि प्रेम, बंधुभाव व आनंदाने साजरा होणाऱ्या गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गोविंदांच्या थरांनी आकाशाला गवसणी घालू दे, आणि श्रीकृष्णाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदू दे!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद