भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर आयोजित महिला मेळावा व भव्य मंगळागौर कार्यक्रमात सहभागी होता आले. सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने पारंपरिक मंगळागौर खेळत या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक खेळ आणि आनंदी वातावरणामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर आणि प्रसन्न झाला. महिलांच्या कलागुणांना वाव देतानाच एकमेकींसोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची ही सुंदर संधी मिळाली.
या कार्यक्रमाला आमदार व महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ. चित्राताई वाघ, कल्याण पूर्व आमदार सौ. सुलभाताई गायकवाड, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. अर्चना सूर्यवंशी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. रुचिताताई घोरपडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. रेखा चौधरी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. रुपाली लठ्ठे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, समाजसेवक श्री. आकाश वाळेकर, शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, महिला मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ पूर्व सौ. कंचन मिश्रा, नगरसेविका सौ. अर्चना चरण रसळ, नगरसेविका सौ. अनिता प्रकाश भोईर, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील,
गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. संगीता गायकवाड, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेविका तथा उपसभापती श्री. किरण चौबे, नगरसेविका तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, नगरसेविका सौ. अपर्णा भोईर, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, नगरसेविका सौ. दर्शना पाटील, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, सौ. छाया निकम, भाजपा महिला उपाध्यक्ष, अंबरनाथ पश्चिम सौ. पूजा रणदिवे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. ज्योती भंडारे, नगरसेविका सौ. संजीवनी देवडे, महिला मोर्चा, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष सौ. ममता त्रिपाठी, सौ. मंजू धल, भाजपा कार्यकर्ता श्री. कृष्णबा शिसोदिया तसेच शहर उपाध्यक्ष श्री प्रकाश वाळुंज उपस्थित होते.
सर्व महिलांनी मिळून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केलेली ही मंगळागौर खरोखरच एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷