Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

01 Sep 2026

2 linked posts
पाहणी Reel

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोहजगाव खदान परिसराला भेट देत विसर्जनस्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याची पातळी, विसर्जनाची व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर हाऊसिंग बोर्ड परिसरातील रस्त्यांची पाहणी करून गणपती विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आवश्यक नियोजन करण्यात आले. विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता, पाणीपातळी, वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच आवश्यक त्या सुविधा याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त CEO डॉ. मयुरेश भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शबीर सय्यद, नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेवक श्री. किरण राठोड, नगरसेविका सौ. अर्चना रसाळ, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, पाणी विभागाचे श्री. सुनील जाधव, आरोग्य विभागाचे प्रमुख श्री. राजेश शिंदे, आरोग्य विभागाचे श्री. महेश तायडे, माजी नगरसेवक तथा ‘लोकमत’ पत्रकार श्री. पंकज पाटील तसेच हाऊसिंग बोर्ड परिसरात नगरसेवक श्री. विकास सोमेश्वर, नगरसेवक श्री. प्रदीप नाना पाटील तसेच शहरप्रमुख, युवासेना अंबरनाथ पूर्व श्री. राहुल सोमेश्वर आदी उपस्थित होते.

गणपती विसर्जनाचा उत्सव भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महाराष्ट्र कार्यकारीणी बैठक Reel

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्र चव्हाणजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

यावेळी पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसह आगामी काळातील विविध उपक्रम, कार्यक्रम व नियोजनाबाबत मार्गदर्शन मिळाले. तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीची विचारधारा, सक्षम नेतृत्व आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर जनसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद