Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

31 Jul 2026

2 linked posts
टाऊन प्लॅनिंग बैठक Photos

अंबरनाथ शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने टाऊन प्लॅनिंग विभागाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकास आराखड्याबाबत तसेच नागरिकांच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी टाऊन प्लॅनिंग विभागाच्या सौ. निकिता भांगे, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. खानजी दल तसेच समाजसेवक श्री. भरत फुलोरे उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे Photos

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महसूल विभागाच्या कामकाजाचा सखोल व तपशीलवार आढावा घेण्यात आला.

यानंतर भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ, उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किसन कथोरे, विधान परिषद आमदार तथा भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, भारत सरकार यांच्या संचालिका सौ. माधवी नाईक, विधान परिषद आमदार श्री. विक्रांत पाटील, ठाणे शहराचे आमदार श्री. संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीप लेले, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तथा महाराष्ट्र महासंघ अध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे, अंबरनाथ शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगरपरिषद नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, ज्येष्ठ नगरसेवक तथा महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना (ठाणे व पालघर जिल्हा) अध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, ठाणे शहर, माजी गटनेते भाजपा श्री. संजय वाघुले तसेच ठाणे महानगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक श्री. मुकेश मोकाशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद