मिसाईल मॅन, भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻
विज्ञान, संशोधन आणि स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या साधेपणातून, दूरदृष्टीतून आणि प्रेरणादायी विचारांतून लाखो तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळत राहील.
"स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात; स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत." या त्यांच्या विचारांप्रमाणेच, त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास प्रत्येक भारतीयासाठी कायम मार्गदर्शक राहील.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷