Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

26 Jul 2026

3 linked posts
जावसई परिसर पाहणी Photos

जावसई परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत विविध समस्यांची पाहणी करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेत संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी समाजसेवक श्री. संजय राम तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री क्रीडा मंडळ उत्सवारंभ Reel

अंबरनाथ येथील श्री क्रीडा मंडळ आयोजित दहीहंडी सराव उत्सवाचा उत्साहपूर्ण शुभारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून आयोजक मंडळाच्या कार्याला शुभेच्छा देत सर्व गोविंदा पथकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण सरावासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री क्रीडा मंडळाचे संस्थापक श्री. नामदेव लोटे, अध्यक्ष श्री. राजाराम लोटे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. रेखा करंजुले, माजी नगरसेवक श्री. संदीप लोटे, विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे तसेच श्री क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि खुंटवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

कारगिल विजय दिवस Graphic

कारगिल युद्धात आपल्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकता ठेवणाऱ्या सर्व वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या अदम्य साहस आणि शौर्याच्या बळावर मातृभूमीची अखंडता अबाधित राखणाऱ्या त्या सर्व वीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विनम्र नमन.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद