चार्टर्ड अकाउंटंट (CA) झालेल्या कु. नेहा मोहम्मद हुसेन जहांगीरदार हिची सदिच्छा भेट घेऊन तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. कु. नेहा जहांगीरदार हिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
अंबरनाथ नगरपरिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले श्री. मोहम्मद हुसेन जहांगीरदार आणि त्यांच्या कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी घेतलेले कष्ट आज खऱ्या अर्थाने फळाला आले आहेत. कुमारी नेहा हिने अथक मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर सी.ए. सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून अंबरनाथ शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
यापूर्वी तिची मोठी बहिणी डॉक्टर आणि दुसरी बहिण ॲडव्होकेट झाल्या असून, तिन्ही मुलींनी आपल्या कर्तृत्वाने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. हे यश केवळ जहांगीरदार कुटुंबाचे नसून संपूर्ण अंबरनाथकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷