आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या व अडचणी मांडण्यासाठी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
तसेच "एक होतं माळीण" या चित्रपटाच्या काही टीम सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली. आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कलाप्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. याशिवाय अनेक नागरिकांनी विविध सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका देऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील व नगरसेवक श्री. शैलेश भोईर देखील उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷