Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

21 Jul 2026

2 linked posts
कानसई गावदेव मंदिर वर्धापन सोहळा Photos

अंबरनाथ पूर्व येथील श्री कानसई गावदेव मंदिराच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून ग्रामदैवत श्री कानसई गावदेवताचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचा योग आला.

मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी प्रार्थना केली.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, समाजसेवक श्री. चेतन चव्हाण, कानसई विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत भोईर, नगरसेवक श्री. शैलेश भोईर तसेच नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

MJP कार्यालय भेट Photos

जावसाई गाव परिसरात अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या समस्येची दखल घेत संबंधित भागातील नागरिकांसह नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसमोर नागरिकांच्या अडचणी सविस्तर मांडण्यात आल्या आणि पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. के. एम. शेकोकरे, MJP सिटी इंजिनिअर श्री. गायकवाड, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद