अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात आज SIR (Special Intensive Revision) संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, १४० अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ, सौ. अर्चना खेतमाळीत-गोरे प्रमुख उपस्थित होत्या. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा आढावा घेऊन मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक व अचूक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत ही प्रक्रिया प्रभावीपणे पोहोचावी यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, तहसीलदार श्री. अमित कोळी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सौ. स्वाती पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती श्री. महेश फुलोरे, महिला व बालकल्याण समिती उपाध्यक्षा सौ. किरण चौबे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, BLO-1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे, कल्याण जिल्हा भाजप सचिव व अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक कोतेकर, भाजप शहराध्यक्ष श्री. प्रजेश तेलंगे, समाजसेवक श्री. दिलीप भोईर, नगरसेवक श्री. उमेश पाटील, नगरसेवक श्री. सुनील वाघे, नगरसेविका सौ. मीनाताई वाळेकर, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेविका सौ. वैशाली थेटे, नगरसेविका सौ. धनलक्ष्मी जयशंकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर,
नगरसेविका सौ. संगीता गायकर तसेच स्वीय सहाय्यक श्री. अजिंक्य पाटील उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷