ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार तथा अध्यक्ष, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढाव्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक पार पडली.
या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, प्रलंबित कामांना गती मिळावी तसेच विकासकामांमध्ये समन्वय साधून अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷