आज अंबरनाथ (पूर्व) येथील मुरबाड चाळ, महालक्ष्मी नगर परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या परिसरात सुरक्षित पादचारी मार्ग (फुटपाथ) नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. यावेळी BLO 1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे व भाजप शक्ती केंद्रप्रमुख सौ. स्वप्नाली शिंदे उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी निवेदन सादर करून सुरक्षित फुटपाथ, गटार बांधकाम तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच या कामांना प्राधान्य देत लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷