Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

14 Jul 2026

1 linked post
सफाई कामगार याचिका, मंत्रालय Photos

आज मुंबई मंत्रालयात अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आली.

महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत अंबरनाथ नगरपरिषदेतील सफाई कामगारांसाठी सदनिका उभारण्याकरिता आवश्यक शासकीय जागा अंबरनाथ नगरपरिषदेस विनामूल्य हस्तांतरित करून देण्याबाबत स्मरणपत्र सादर करण्यात आले.

तसेच याचवेळी भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सौ. चित्राताई वाघ यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमचे मार्गदर्शक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किसनजी कथोरे साहेब, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुचिताताई राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद