Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

13 Jul 2026

3 linked posts
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चिखलोली Photos

चिखलोली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ब्रह्मलीन तपस्वी ह.भ.प. श्रीगुरु वासुदेव महाराज मढवी यांच्या पाचव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन घेण्याचा व सहभागी होण्याचा योग आला.

टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तनात सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर अनुभवला. भक्तिमय वातावरण, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या विचारांचा जागर यामुळे मन प्रसन्न झाले.

याप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, वारकरी संप्रदायातील मान्यवर, भाविक भक्त तसेच चिखलोली परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांसमवेत विठ्ठल चरणी प्रार्थना करून समाजात सुख, शांती, समृद्धी आणि ऐक्य नांदो, अशी प्रार्थना केली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

समिती सभापती निवडणूक शुभेच्छा Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली. माननीय पिठासीन अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदांसाठी प्रत्येकी एकच वैध नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने संबंधित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यामध्ये श्री. शैलेश शालिक भोईर यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापती, सौ. रेश्मा समीर गुडेकर यांची शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती, सौ. सुनिता तानाजी पाटील यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती, श्री. महेश काथोड फुलोरे यांची नियोजन व विकास समिती सभापती, सौ. स्वाती अतिश पाटील यांची महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा तसेच सौ. किरण प्रमोदकुमार चौबे यांची महिला व बालकल्याण समिती उपाध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली.

यानंतर माननीय पिठासीन अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या कार्यकाळात अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळो, हीच शुभेच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

कृष्णा पॅलेस हॉटेल सत्यनारायण महापूजा Photos

उल्हासनगर येथील कृष्णा पॅलेस हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून दर्शन घेत शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. स्वाती पाटील, नगरसेवक श्री. नाना डेरे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील यांची उपस्थिती लाभली.

कृष्णा पॅलेस हॉटेलच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या उत्तम सेवेमुळे हे हॉटेल यशाची नवी शिखरे गाठो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद