अंबरनाथ पूर्व येथील साईज्योत फाउंडेशनचे न्यूरोनेस्ट चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, आयएसएफ ऑटिझम स्पेशल स्कूलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा योग आला. यावेळी आर्य गुरुकुलचे संचालक श्री. भरत मलीक देखील उपस्थित होते.
ऑटिझमग्रस्त मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेष काळजी, प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे हे केंद्र समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे विशेष मुलांना सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी निश्चितच मोठे बळ मिळेल, असा विश्वास आहे.
या समाजोपयोगी उपक्रमासाठी साईज्योत फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷