Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

10 Jul 2026

3 linked posts
Inner wheel club of Ambarnath Photos

इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा सौ. रचना दलाल व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित अध्यक्षपद हस्तांतरण सोहळा (Installation Ceremony) तसेच डायमंड जुबिली इयर (हीरक महोत्सवी – ६० वे वर्ष) सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रीता बिपिन तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून इनर व्हील क्लबने जपलेली सेवाभावी परंपरा अशीच अधिक समृद्ध होत राहो. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक व्यापक, प्रभावी आणि लोकहितकारी ठरो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय Photos

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात आज शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच शहरातील श्वानप्रेमींनीही भटक्या श्वानांच्या देखभाल, सुरक्षितता, लसीकरण व त्यांच्या संबंधित विविध मुद्द्यांबाबत सूचना मांडल्या.

नागरिकांनी मांडलेल्या विविध विषयांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येक समस्येचे योग्य व तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड वाढदिवस Photo

अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. उमाकांत गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

प्रशासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असतानाच शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग आणि जनहिताप्रती असलेली बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे.

त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो तसेच अंबरनाथ शहराच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद