Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

09 Jul 2026

3 linked posts
अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय Photos

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी विविध समस्या, सूचना तसेच विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या विविध विषयांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात आणि शहराचा विकास अधिक गतिमान व्हावा यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

त्यानंतर काही नागरिकांनी सदिच्छा भेट घेत आगामी कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिका दिल्या. यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शुभेच्छा आणि विश्वासाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप शिबिर Photos

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर आयोजित 'देवा भाऊ चष्मा - ध्येय विकसित भारत २०४७' अंतर्गत आयोजित मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थित राहण्याचा योग आला.

सर्वसामान्य नागरिकांना ही आरोग्यसेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा जनहिताचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. गरजू नागरिकांना वेळेत उपचार, नेत्रतपासणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या सेवाभावी प्रयत्नामुळे समाजात लोककल्याणाची भावना अधिक बळकट होत असून 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळत आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेविका सौ. वैशाली जगदीश थेटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. यावेळी नगरसेविका सौ. मीना वाळेकर, समाजसेवक श्री. जगदीश थेटे, समाजसेविका सौ. गीता डामसे तसेच अंबरनाथ पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री. अंबरेश गौडा उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिन Graphic

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ही केवळ एक विद्यार्थी संघटना नसून, राष्ट्रभक्ती, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी हितासाठी सातत्याने कार्य करणारी प्रेरणादायी चळवळ आहे.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवेची भावना, नेतृत्वगुण आणि सकारात्मक परिवर्तनाची जाणीव निर्माण करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! राष्ट्रहित, विद्यार्थीहित आणि समाजहिताच्या कार्याला अशीच नवी ऊर्जा व यश लाभो, हीच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद