Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun
1
4 posts
2
4 posts
3
2 posts
4
1 post
5
3 posts
6
3 posts
7
2 posts
8
3 posts
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31

08 Jul 2026

3 linked posts
वारी Graphic

ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा अखंड वारसा जपत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. या पवित्र वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा!

विठ्ठल नामाचा गजर, संतांच्या विचारांची प्रेरणा आणि समाजसेवेचा संकल्प प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण करो, हीच माऊली चरणी प्रार्थना!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

पाहणी Reel

शहरातील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवता यावे, यासाठी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

ज्या ठिकाणी पाणी साचले होते, नाले तुडुंब भरले होते तसेच रस्त्यांवर पाणी साठले होते, त्या सर्व ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीत व्यवस्था आणि अत्यावश्यक नागरी सुविधा अबाधित राहाव्यात यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. राजेश शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री. सुनील जाधव, शहर अभियंता श्री. राजेश तडवी, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेविका सौ. स्वाती पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापूसाहेब शिंदे तसेच शहर सरचिटणीस श्री. रणविजय यादव उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप Photos

भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर आयोजित, पप्पूदादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच स्व. सतीश पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रमेश साहेबराव गुंजाळ (पप्पूदादा) यांच्या जयंतीनिमित्त मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लहान मुलांसाठी मोफत वह्या वाटप या समाजोपयोगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात आले.

आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा या त्रिसूत्रीला बळ देणारे असे उपक्रम समाजहितासाठी प्रेरणादायी असून, गरजू नागरिकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्याचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. नितीन गुंजाळ, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. छाया निकम उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद