Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

05 Jul 2026

3 linked posts
ANSSI wellness उद्घाटन सोहळा Photos

आज अंबरनाथ (पूर्व) येथील दत्ता कुटीर बिल्डिंगमध्ये ANSSI Wellness या क्लिनिकच्या उद्घाटन समारंभास माजी आमदार श्री. नरेंद्र पवार यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, श्री. अमित सुपेकर (Vice President – Business Operations), श्री. बृजेश विश्वकर्मा (Clinic Head, Ambernath), श्री. केशव कांबळे (Mentor) तसेच ANSSI Wellnessच्या संपूर्ण टीमची उपस्थिती लाभली.

नवीन क्लिनिकच्या माध्यमातून अंबरनाथकरांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि संस्थेची यशस्वी वाटचाल अधिकाधिक उंचीवर जावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

रॉयल पार्क शॉर्टसर्किट पाहणी Photos

रॉयल पार्क सोसायटी येथे मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेविका सौ. स्वाती पाटील तसेच भारतीय जनता युवा मोर्चा अंबरनाथ शहराध्यक्ष श्री. आतिश पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद सर्वसाधारण सभा Photos

अंबरनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये अंबरनाथ शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रस्तावांवर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे सर्व माननीय नगरसेवक उपस्थित होते. नागरिकहिताला प्राधान्य देत शहराच्या प्रगतीसाठी रचनात्मक चर्चा व निर्णय प्रक्रियेला गती देण्यात आली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद