आज अंबरनाथ नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत मुली व मुलांसाठी कराटे व मार्शल आर्ट प्रशिक्षणाचा शुभारंभ नगरपरिषद शाळा, मोरीवली येथे करण्यात आला. या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण पुढील दोन महिने दररोज एक तास घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षणाची भावना विकसित करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.
यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख सौ. किमया पवार, श्री. संजय कुलकर्णी, शाळा क्रमांक ३ च्या केंद्रप्रमुख सौ. मोरे, माध्यमिक शाळा मोरीवलीच्या प्राचार्या सौ. साळुंखे तसेच शाळा क्रमांक ६ च्या प्राचार्या सौ. हिरे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷