Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun
1
4 posts
2
4 posts
3
2 posts
4
1 post
5
3 posts
6
3 posts
7
2 posts
8
3 posts
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31

01 Jul 2026

4 linked posts
मा.श्री. रवींद्र चव्हाण साहेब वर्षपूर्ती शुभेच्छा Graphic

कर्तृत्व, संघटन कौशल्य आणि पक्षविस्ताराच्या दृढ संकल्पाने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाणजी यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले नेतृत्व, कार्यतत्परता आणि जनसेवेची अखंड प्रेरणा अशाच जोमाने पुढेही महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देवो, हीच सदिच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

महाराष्ट्र कृषी दिन Graphic

अन्नदात्याच्या अथक परिश्रम, जिद्द आणि समर्पणामुळेच आपल्या जीवनाची घडी सुरळीत चालते. शेतकरी समृद्ध झाला तरच महाराष्ट्र अधिक सक्षम, संपन्न आणि प्रगत होईल. आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रीय डॉक्टर्स दिन Graphic

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीचे जतन करणारे प्रत्येक डॉक्टर समाजासाठी प्रेरणास्थान आहेत.

रुग्णसेवा, समर्पण, संवेदनशीलता आणि अथक परिश्रम यांच्या बळावर असंख्य जीवनांना नवी आशा देणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 आपल्या ज्ञान, सेवाभाव आणि निस्वार्थ कार्याला मनःपूर्वक वंदन!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

चार्टर्ड अकाउंटंट दिन Graphic

चार्टर्ड अकाउंटंट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा मजबूत पाया रचत उद्योग, व्यवसाय आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या ज्ञान, प्रामाणिकपणा आणि समर्पित सेवेमुळे आर्थिक व्यवस्थेला नवी दिशा आणि बळ मिळत राहो, हीच सदिच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद