Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

29 Jun 2026

7 linked posts
देवाभाऊ चष्मा, मोफत नेत्र तपासणी Photos

भारतीय जनता पार्टी, अंबरनाथ शहर यांच्या वतीने आयोजित "देवा भाऊ चष्मा उपक्रम" अंतर्गत मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिर पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नेत्रतपासणी करून घेतली तसेच नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल आयोजक नगरसेवक श्री. पवन सुरेश वाळेकर, नगरसेविका सौ. मीनाताई सुरेश वाळेकर आणि नगरसेविका सौ. मिनूताई सिंग यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन. अशा लोकहितकारी उपक्रमांमुळे समाजसेवेची भावना अधिक बळकट होत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय Photos

अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय येथे शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट देत त्यांच्या विविध समस्या, अडचणी, विकासकामे तसेच शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकाभिमुख व विकासाभिमुख कामांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचे तातडीने व प्रभावीपणे निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधा आणि अधिक सक्षम व प्रभावी प्रशासनासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

ॲनिमल नाटक Reel

धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर येथे सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या 'ॲनिमल' या नाट्यप्रयोगाला संपूर्ण कुटुंबासमवेत उपस्थित राहण्याचा योग आला. उत्कृष्ट अभिनय, प्रभावी सादरीकरण आणि दमदार कथानकामुळे हा नाट्यप्रयोग मनाला भिडणारा ठरला. या अविस्मरणीय नाट्यप्रयोगाचा मनमुराद आनंद घेतला.

यावेळी आपले लाडके "दादूस" श्री. संतोष चौधरी, लोकनेते श्री. गुलाबराव करंजुले पाटील, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, मा. नगराध्यक्ष सौ. प्रज्ञा बनसोडे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, कल्याण जिल्हा भाजपा सचिव तथा अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे, सरचिटणीस अंबरनाथ शहर श्री. राजेंद्र कुलकर्णी, BLO-1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे, भाजपा अंबरनाथ पूर्व कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापू शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. पौर्णिमा जाधव, महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सचिव सौ. रूपाली लठ्ठे, अंबरनाथ शहर पूर्व अध्यक्षा श्रीमती ज्योती डोंगरे, अंबरनाथ शहर पूर्व सचिव सौ. सुरेखा शहा, उद्योग उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे तसेच भाजपा ठाणे जिल्हा सचिव श्री. संदीप विशे यांचीही उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सिद्धार्थ जाधव शुभेच्छा भेट Photos

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांन जीबीके ग्रुप कार्यालयास सदिच्छा भेट देत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव पाटील, कल्याण जिल्हा भाजपा सचिव व अंबरनाथ विधानसभा प्रभारी श्री. दिलीप कणसे, महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा सचिव सौ. रूपाली लठ्ठे, उद्योग उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे, BLO-1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे, भाजपा अंबरनाथ पूर्व कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापू शिंदे, श्री. श्रीकांत रेड्डी, श्री. अमोल अमोबावली, श्री. लक्ष्मणदत्त पंत तसेच श्री. दिलीप हांडे उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रीय सांख्यिकी दिन/ प्रशांत चंद्र महालनोबिस जयंती Graphic

भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक, प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻

सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक माहिती, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा दिवस आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

कबीरदास जयंती Graphic

महान संत, समाजसुधारक आणि निर्भीड विचारवंत संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻

जात-पात, अंधश्रद्धा आणि भेदभाव यांना विरोध करत त्यांनी प्रेम, सत्य, समता आणि मानवतेचा संदेश आपल्या दोह्यांतून संपूर्ण समाजाला दिला. त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वटपौर्णिमा शुभेच्छा Graphic

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

वटवृक्षाप्रमाणे नात्यांना स्थैर्य लाभो, विश्वासाची मुळे अधिक घट्ट रुजोत आणि प्रेम, आदर व समृद्धीने प्रत्येक संसार फुलत राहो.

अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन सदैव बहरत राहो, वटसावित्री पौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद