आज अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या अंबरनाथ कडिया प्रीमियर लीग - लेडीज क्रिकेट टूर्नामेंटमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिलांचा उत्साह, आत्मविश्वास आणि खेळाप्रती असलेली जिद्द पाहून मनापासून आनंद झाला.
खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि आत्मविश्वास घडवणारे प्रभावी माध्यम आहे. अशा उपक्रमांमुळे महिला अधिक सक्षम होत असून समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होते.
या सुंदर स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अंबरनाथ कडिया समाज तसेच प्रायोजक सतीश परमार, जयंती परमार, नरेश परमार आणि हसमुख परमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सर्व सहभागी महिला खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷