मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ऊर्जा बचतीच्या संदेशातून प्रेरणा घेत तसेच आदरणीय चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या "इंधन संरक्षण व खाद्यतेल बचत जनजागृती अभियान" उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.
अंबरनाथ महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या उपक्रमामध्ये महिलांनी गॅसचा तसेच स्वयंपाकामध्ये तेलाचा वापर न करता आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त खाद्यपदार्थ तयार करून एक प्रेरणादायी संदेश दिला.
महिला मोर्चा अंबरनाथ पूर्व अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा यांच्या निवासस्थानी आयोजित या उपक्रमात सहभागी होत सर्व महिला भगिनींच्या उत्साहाचे कौतुक केले. ऊर्जा बचत, आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींना चालना देणारे असे उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव सौ. रूपाली लठ्ठे, महिला मोर्चा अंबरनाथ पश्चिम अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव, कल्याण जिल्हा महिला मोर्चा सचिव सौ. ममता त्रिपाठी,
महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुप्रिया कदम, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनीता सिंग, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. आशा बडेकर, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. हेमा सिंग, महिला मोर्चा सचिव सौ. सलमा खान, महिला मोर्चा सचिव सौ. वैशाली भाकरे, महिला मोर्चा सचिव सौ. जानकी ठाकूर, शहर चिटणीस सौ. वैशाली नलवडे, महिला मोर्चा सचिव सौ. मीना सिंग, महिला मोर्चा सचिव सौ. महालक्ष्मी शावनी, महिला मोर्चा कार्यकर्त्या सौ. भारती तायडे, सौ. रूपाली शिंदे व सौ. कविता चौधरी उपस्थित होत्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷