आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात विविध लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाचे विषय मांडले. यावेळी नगरसेविका सौ. सुजाता भोईर यांनी महिला बचत गटांशी संबंधित विविध प्रश्न व सूचना मांडल्या.
नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री शैलेश भोईर, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे यांनी शुभेच्छा भेटीसह आपल्या प्रभागातील विविध विकासकामे व नागरिकांच्या समस्या मांडल्या तसेच नगरसेविका सौ. धनलक्ष्मी जयशंकर यांनी आपल्या प्रभागातील नालेसफाई, स्वच्छता व इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी व मागण्या मांडल्या.
यावेळी नागरिकांच्या समस्या, प्रलंबित कामे व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷