आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या, सूचना व तक्रारी जाणून घेतल्या. नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर नागरी सुविधांबाबत विविध विषय मांडले.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷