गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आयोजित तसेच जीबीके ग्रुप, क्रीडा भारती अंबरनाथ यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अटल उद्यान येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी योगाचार्य श्री. दिनेश सिंग (अध्यक्ष, क्रीडा भारती) यांच्या मार्गदर्शनानुसार विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी लोकनेते तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव बाबुराव करंजुले पाटील, गटनेता व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील, डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, माजी नगरसेवक श्री. भरत फुलोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, श्रीराम मंदिर स्कूलच्या ट्रस्टी व प्रिन्सिपल शोभा कदम, अंबरनाथ विधानसभा BLO-1 श्री. संतोष शिंदे, समाजसेवक श्री. चेतन चव्हाण, अंबरनाथ पश्चिम अध्यक्ष श्री. लक्ष्मणदत्त पंत, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनिता सिंग, महिला मोर्चा सचिव सौ. वैशाली भाकरे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुप्रिया कदम, अंबरनाथ शहर (पूर्व) सचिव सौ. रीना मोरे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. वैशाली नलवडे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. आशा बडेकर, समाजसेविका श्रीमती ज्योती डोंगरे, महिला मोर्चा सचिव कृष्णाबा शिसोदिया, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. हेमा सिंग, कल्याण जिल्हा महिला मोर्चा सचिव सौ. ममता त्रिपाठी, महिला मोर्चा सचिव सौ. महालक्ष्मी शावनी व डॉ. राम जामोदे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"योग ही निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे" हा संदेश या सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमातून देण्यात आला.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷