Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

20 Jun 2026

6 linked posts
अंबरनाथ नगरपरिषद शाळा छत्र्या व वह्या वाटप Reel

शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत अंबरनाथ नगरपरिषदेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना छत्री, पेन्सिल बॉक्स, वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

अंबरनाथ नगरपरिषद शाळा खुंटिवली, शारदा शाळा, अंबरनाथ नगरपरिषद शाळा कानसई, वडोलगाव, श्रीराम मंदिर शाळा तसेच माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील यांच्या कोहोजगाव येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे आणि त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. किरण राठोड, नगरसेवक श्री. महेश फुलोरे, नगरसेविका सौ. धनलक्ष्मी जयशंकर, नगरसेवक श्री. मनीष म्हात्रे, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, नगरसेविका सौ. अर्चना रसाळ, नगरसेवक श्री. उमेश पाटील, माजी नगरसेवक श्री. पांडुरंग खराडे, माजी नगरसेवक श्री. भरत फुलोरे, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. पौर्णिमा जाधव, अंबरनाथ विधानसभा BLA-1 अध्यक्ष श्री. संतोष शिंदे, महिला मोर्चा युवती अध्यक्ष सौ. सुनिता लयाळ, अंबरनाथ पश्चिम अध्यक्ष श्री. लक्ष्मणदत्त पंत, अंबरनाथ शहर (पूर्व) सचिव सौ. रीना मोरे, अंबरनाथ शहर (पूर्व) सचिव सौ. सुरेखा शहा, अंबरनाथ शहर सरचिटणीस श्री. राजेंद्र कुलकर्णी, भाजप कार्यकर्त्या महालक्ष्मी शावणी, भाजप कार्यकर्ते श्री. कृष्णबा शिसोदिया, समाजसेवक श्री. जयशंकर रामन, श्रीराम मंदिर स्कूल ट्रस्टी सौ. शोभा कदम, समाजसेवक श्री. सुरेंद्र पाटील, समाजसेवक श्री. चरण रसाळ,

यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मोतीराम पार्क रोड उद्घाटन सोहळा Reel

मोतीराम पार्क रोडचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. अनेक दिवसांपासून नागरिकांकडून या रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती. आता हा रस्ता पूर्णत्वास आल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सातत्याने काम सुरू असून विकासाची ही वाट अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.

यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव, नगरसेवक श्री. महेश फुलोरे, माजी नगरसेवक श्री. भरत फुलोरे, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील तसेच समाजसेवक श्री. सुरेंद्र पाटील उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

न्यू भेंडीपाडा पाहणी Photos

अंबरनाथ येथील नवीन भेंडीपाडा परिसराला भेट देऊन तेथील विविध नागरी समस्यांची पाहणी केली. नागरिकांनी निवेदनाद्वारे आपल्या अडचणी, सूचना व तक्रारी मांडल्या.

यावेळी परिसरात कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने निर्माण होणारी अस्वच्छता तसेच काही ठिकाणी लहान-मोठ्या नाल्यांच्या साफसफाईचे निर्देश देण्यात आले. यापूर्वी बहुतांश नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात आली असली तरी ज्या ठिकाणी साफसफाई राहिली आहे, त्या भागांमध्ये तात्काळ काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. याप्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. पौर्णिमा जाधव तसेच समाजसेवक श्री. यश जगळे उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

लक्ष्मणराव किर्लोस्कर जयंती Graphic

भारतीय उद्योगविश्वाला नवी दिशा देणारे, स्वदेशी उद्योगधंद्यांचे प्रणेते आणि किर्लोस्कर समूहाचे संस्थापक आदरणीय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

आपल्या दूरदृष्टी, कष्ट आणि उद्योजकतेच्या बळावर त्यांनी भारतीय औद्योगिक विकासाचा भक्कम पाया रचला. त्यांचे कार्य आणि विचार आजही असंख्य उद्योजकांना प्रेरणा देत आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

द्रौपदी मुर्मू जी वाढदिवस Graphic

भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती, देशाच्या गौरवशाली नेतृत्वाचे प्रतीक आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

त्यांचे साधेपण, संघर्षमय प्रवास आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा लाखो भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि निरंतर यशस्वी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

विश्वजीत करंजुले सर वाढदिवस Graphic

मला नेहमी साथ देणारे, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे, प्रत्येक पावलावर मला प्रोत्साहन देणारे आणि समाजकार्यातही तितक्याच समर्पणाने कार्य करणारे माझे जीवनसाथी श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपल्या कार्यतत्परतेने, जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने आणि समाजहितासाठी केलेल्या योगदानाने आपण एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या या प्रवासाचा मला नेहमीच अभिमान वाटतो.

ईश्वरचरणी प्रार्थना की, आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश लाभो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि यशाची नवी शिखरे आपण सर करावीत, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद