Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

19 Jun 2026

4 linked posts
अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय येथे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध प्रभागांतील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक समस्या तसेच विकासकामांबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या अडचणी व सूचनांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आणि विकासकामांना गती देणे हीच आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर अंबरनाथच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अधिक दृढपणे पुढे नेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

म्हाडा कॉलनी उद्यान लोकार्पण सोहळा Reel

महालक्ष्मीनगर येथील म्हाडा कॉलनी परिसरातील उद्यानाचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. परिसरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुसज्ज आणि सुंदर जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका सौ. मोनिका रिंजड, माजी नगरसेवक श्री. पंकज पाटील, माजी नगरसेवक श्री. राजू शिर्के, माजी नगरसेवक श्री. रवी पाटील, श्री. रामदास शिंगवे, महिला संघटक सौ. मालतीताई पवार, सौ. संगीता उतेकर, माजी नगरसेविका सौ. मंगल घोणे, माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत भोईर, श्री. आबा महाजन तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आनंद, आरोग्य आणि सामाजिक एकोपा वाढविणाऱ्या अशा सुविधा निर्माण करणे हे स्थानिक विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधा वाढविण्यासाठी अशाच लोकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

TDS बँक निवडणूक बैठक Photos

भारतीय जनता पार्टी कार्यालय, बी केबिन रोड, अंबरनाथ येथे टीडीएस बँक निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, नियोजन तसेच निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभेचे माजी खासदार श्री. कपिल पाटील साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी निवडणूक नियोजन, संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आगामी निवडणूक यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबींवर मौल्यवान मार्गदर्शन केले.

यावेळी नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, माजी मंडळ अध्यक्ष श्री. सर्जेराव माहुरकर, उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, सरचिटणीस श्री. संदीप गुप्ता, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. हरी, सरचिटणीस श्री. राजेंद्र कुलकर्णी, विधानसभा संयोजक श्री. ओमकार काळे, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. सुनील वाघे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, सौ. अनिता भोईर, सौ. पूनम जाधव, श्रीमती ज्योती डोंगरे, सौ. सुनीता लायल, सौ. सुरेखा शहा, श्री. दीपक कोतेकर, श्री. रणवीर यादव, श्री. संतोष शिंदे, श्री. लक्ष्मण गुप्ता, श्री. सुभाष करंजुले, श्री. रणजीत सिंह, श्री. महेश मोरे, श्री. उमेश लाभरे आणि श्री. अमर पाल उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गुरू हर गोविंद सिंगजी जयंती Graphic

शीख धर्माचे सहावे गुरु, अद्वितीय योद्धा, दूरदर्शी विचारवंत आणि धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित करणारे गुरु हरगोविंद सिंगजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

धैर्य, शौर्य, आध्यात्मिकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, त्यांचे जीवन आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या शिकवणीतील सेवा, समर्पण आणि मानवतेची मूल्ये आपण सर्वांनी जपली पाहिजेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद