अंबरनाथ लोकनगरी येथील टिळक ग्लोबल स्कूलकडे जाणारा रस्ता बऱ्याच दिवसांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या समस्येची दखल घेत संबंधित रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करण्यात आला आहे.
आज या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भेट देण्यात आली यावेळी समाजसेवक श्री. विजय पाटील हे देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास, पालकांची सोय आणि नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷