आज अंबरनाथ शहरातील विविध भागांतून नागरिक भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या परिसरातील समस्या, सूचना, अडचणी तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांना गतीने मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷