अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील सर्व नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि विविध उपक्रमांमुळे शाळांचा परिसर आनंदाने बहरून गेला होता.
आज शाळा प्रवेशोत्सव निमित्त अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळा क्र. १ कैलासनगर, मोरिवली गाव, शिवगंगा नगर, UPSC भवन तसेच अंबरनाथ गाव येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत नवीन शैक्षणिक वर्षाच्या आनंदात सहभागी होता आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले तसेच शिक्षणाचे महत्त्व आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या तसेच पेन्सिल बॉक्सचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्याधिकारी मा. श्री. उमाकांत गायकवाड, अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सौ. किमया पवार, नगरसेवक श्री. अब्दुलभाई शेख, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कंचन मिश्रा, नगरसेविका सौ. संजीवनी देवडे, नगरसेविका सौ. वैशाली थेटे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. रंजना कोतेकर, समाजसेवक श्री. जगदीश थेटे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनिता सिंग, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. हेमा सिंग तसेच महिला मोर्चा सचिव सौ. पुष्पा मोभारकर व महिला मोर्चा सचिव सौ. फर्जाना शेख उपस्थित होते.
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि नव्या शैक्षणिक वर्षाबद्दलची उमेद पाहून हा शाळा प्रवेशोत्सव अधिक संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी अंबरनाथ नगरपरिषद सातत्याने कार्यरत आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷