Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

13 Jun 2026

3 linked posts
शाळा प्रवेश आव्हान

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आपल्या पाल्याला सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळांना आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थीकेंद्रित बनविले आहे. मी सर्व पालकांना मनापासून आवाहन करते की, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या.

आज आपल्या नगरपालिका शाळा केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सक्षम केंद्रे बनली आहेत. आधुनिक शिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, दप्तर तसेच विविध शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना कोणतीही फी न आकारता उपलब्ध करून दिल्या जातात.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा प्रशिक्षण, संस्कारक्षम वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या असंख्य संधी लक्षात घेता, जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळांमध्ये घ्यावा, असे मी सर्वांना नम्र आवाहन करते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

क्रांतिवीर बाबाराव सावरकर जयंती Graphic

क्रांतीची मशाल हाती घेऊन स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे, अदम्य राष्ट्रभक्ती आणि त्यागाचे प्रतीक असलेले बाबाराव सावरकर उर्फ गणेश दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले संघर्षमय कार्य, भोगलेल्या यातना आणि राष्ट्रसेवेची अखंड तळमळ आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाचा आदर्श जपूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे पुण्यतिथी Graphic

मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक, चित्रपट आणि समाजप्रबोधन या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते व विचारवंत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा मिळाली, तर त्यांच्या विचारांतून परिवर्तनाची प्रेरणा. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीवांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे कार्य सदैव स्मरणात राहील.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद