आहुती या साप्ताहिकाच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
११ जून १९६६ रोजी सुरू झालेल्या "आहुती" या साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकी, सकारात्मक विचार आणि जनहिताची भूमिका जपत यशस्वीपणे ६० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. "वाटचाल ६० वर्षांची... सकारात्मक विचारांची, सामाजिक बांधिलकीची" ही ओळख कायम राखत साप्ताहिकाने पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
या विशेष प्रसंगी "आहुती"चे संपादक श्री. गिरीश वसंत त्रिवेदी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, माजी अध्यक्ष श्री. सर्जेराव माहुरकर तसेच "आहुती" साप्ताहिकाचे संपादक श्री. गिरीश वसंत त्रिवेदी उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷