Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

09 Jun 2026

5 linked posts
मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प Reel

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील (आप्पासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थमा उपचार शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

स्वानंद शॉपिंग सेंटर, अंबरनाथ येथे पार पडत असलेल्या या शिबिरात अस्थमा, दमा आणि श्वसनविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हैदराबादच्या सुप्रसिद्ध "फिश प्रसादम" आयुर्वेदिक उपचार पद्धती अंबरनाथ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली. हजारो नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आरोग्यसेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

जनसेवेची बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आणि समाधानकारक ठरला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प Reel

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील (आप्पासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत अस्थमा उपचार शिबिर स्वानंद शॉपिंग सेंटर, अंबरनाथ येथे सुरू आहे.

मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील (आप्पासाहेब) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक मा. श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

अस्थमा, दमा तसेच श्वसनाच्या विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी या शिबिरात आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हैदराबाद येथील सुप्रसिद्ध "फिश प्रसादम" उपचार अंबरनाथ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपचारपद्धतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने नागरिक शिबिराचा लाभ घेत आहेत. आज रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोफत शिबिराचा सर्व नागरिकांनी नक्की लाभ घ्यावा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर Reel

श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, खासदार श्री. श्रीकांत शिंदे, आमदार सौ. सुलभाताई गायकवाड, आमदार श्री. किसन कथोरे साहेब, आमदार श्री. कुमार आयलानी, आमदार श्री. राजेश मोरे, माजी केंद्रीय मंत्री श्री. कपिल पाटील, ज्येष्ठ नेते श्री. जगन्नाथ पाटील, माजी आमदार श्री. नरेंद्र पवार, माजी आमदार श्री. सुभाष भोईर, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर श्री. राहुल दामले, भाजपा गटनेते श्री. शशिकांत कांबळे, एसआयआर जिल्हाप्रमुख श्री नाना सूर्यवंशी, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, मा नगरसेवक श्री मिलिंद गान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिनव गोयल यांच्यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान महादेवांच्या कृपेने आणि सर्व भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कृतज्ञता सोहळा अत्यंत दिमाखदार आणि अविस्मरणीय ठरला.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

तेजश्री ताई byte video

लोकनेते, राज्य परिषद सदस्य, अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत अस्थमा उपचार शिबिर आज रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अस्थमा, दमा तसेच श्वसनाच्या विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या सर्व नागरिकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हैदराबाद येथील सुप्रसिद्ध "फिश प्रसादम" उपचार अंबरनाथ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपचारपद्धतीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने नागरिक शिबिराचा लाभ घेत आहेत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी Graphic

थोर स्वातंत्र्यसैनिक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अखंड लढा देणारे, जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण करणारे भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या अदम्य धैर्य, त्याग आणि नेतृत्वाने स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. समाजजागृती, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद